आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Critics Raju Shetty Stand With Bjp Mahayuti

आठवले, जानकरांनंतर शिवसेनेने आता राजू शेट्टींना फैलावर घेतलं!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपने महायुतीतील घटकपक्षांना विविध प्रलोभने दाखवून आपल्या जाळ्यात ओढल्याने शिवसेना घटकपक्षांच्या नेत्यांच्या वैचारिक भूमिकेवर शंका उपस्थित करीत आली आहे. सर्वप्रथम त्यांनी रामदास आठवले यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर बुधवारी महादेव जानकर व आज राजू शेट्टी यांना सेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून चांगलचं फैलावर घेतले आहे. मेटेंची ताकद, भूमिका मर्यादित असल्याने सेना त्यावर भाष्य करून मेटेंना महत्त्व देईल असे सध्यातरी वाटत नाहीये. मात्र, आठवले, जानकर व राजू शेट्टींना सेनेने बोचरे सवाल उपस्थित करून त्यांच्या पाठीराख्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. सेना त्यात यशस्वी होत असल्यानेच शिवसेना 'सामना'तून या नेत्यांवर बाण सोडत आहे.
भाजपने 25 वर्षाची शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर सर्व घटकपक्षांना विविध सत्तेची पदे देण्याचे आश्वासन देत आपल्याकडे खेचून घेतले. त्यानंतर सेनेने आठवले, जानकरांना लक्ष्य केले. आता राजू शेट्टींना लक्ष्य केले आहे. आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, राजू शेट्टी स्वत: ‘रालोआ’वर तोंडसुख घेतात व त्याच तोंडाने शिवसेनेने ‘रालोआ’तून बाहेर पडू नये असा सल्ला शिवसेनेला देतात, हे काय गौडबंगाल आहे? शेट्टी यांनी मोदी सरकारच्या विरोधात गर्जना केल्या तेव्हा राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना फटकारले होते, पण शेवटी काय? बिळात नेण्यासाठी चार शेंगा त्यांच्याही तोंडी लागल्याने महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचे त्यांच्या लेखी भले झाले असे मानायला हरकत नाही, अशी टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शिवसेनेला असा सल्ला दिला आहे की, ‘‘शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडू नये!’’ राजू शेट्टी यांची भावना आम्ही समजू शकतो, पण भाजपबरोबर आज राज्यातील जे स्वयंघोषित मित्रपक्ष आहेत त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शिवसेना ‘रालोआ’त आहे. किंबहुना ‘रालोआ’चे बाळंतपण, बारसे वगैरे सर्वकाही शिवसेनेच्या उपस्थितीत झाले आहे. वाजपेयींची सत्ता दिल्लीत होती तेव्हा याच ‘राओला’त शिवसेनेसह 23 वगैरे पक्ष सामील होते. त्या ‘रालोआ’चा थाटमाट काही औरच होता, पण सत्ता गेली व भाजपचीही दाणादाण उडाली. तेव्हा जे एक-दोन पक्ष ‘रालोआ’ म्हणून उरले त्यात शिवसेना होती. नंतर बिहारचे नितीशकुमारही गेले तेव्हा शिवसेना, अकाली दल व भाजप असा तिघांचाच ‘रालोआ’ होता. त्यामुळे आम्ही ‘रालोआ’त आहोत ते विद्यमान भाजप नेत्यांच्या उदयाच्या आधीपासून. ‘रालोआ’ आम्ही प्रतिकूल काळातही टिकवून ठेवली. आम्ही विचार बदलला नाही की पार्ट्या बदलल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ‘रालोआ’त राहायचे की आणखी काय करायचे याचा निर्णय आम्हीच घेऊ शकतो, अशी टीका राजू शेट्टींवर अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने राजू शेट्टींना कोणता दिला सल्ला...