आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला महापालिकेचा नकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे तब्बल अर्ध्या शतकांपासून बनलेले समीकरण यंदा विस्कटताना दिसत आहे. मुंबई महानगर पालिकेने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरचा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा आहे.

महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उच्च न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला असून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच करण्याच निर्धार व्यक्त केला आहे. मागील वर्षी महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेने उच्चन्यायालयातून परवानगी मिळवली होती.

गणेशउत्सवाच्या काळात शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागणारा अर्ज पालिकेकडे करण्यात आला होता. त्यावर आज वॉर्ड अधिका-यांनी शिवाजी पार्क 'शांतता क्षेत्र' असल्याचे कारण पुढे करत परवानगी नाकारली आहे. गेल्या वर्षीही पालिकेने याच कारणामुळे परवानगी नाकारली होती. त्यांनतर शिवसेनेचे विभाग प्रमुख अ‍ॅड अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मेळाव्याला परवानगी मिळवली होती. मात्र, त्याच वेळी न्यायालयाने पुढील मेळाव्यासाठी वेगळी जागा शोधण्याचे निर्देश शिवेसेनेला दिले होते. त्यामुळे आता शिवसेना पुन्हा उच्च न्यायालयात गेल्यानंतर मागील वर्षांप्रमाणे यंदाही सशर्त परवानगी मिळेल की, गेल्या वर्षी दिलेल्या निर्देशांचे पालन अर्थात, वेगळी जागा शोधण्याचे आदेश मिळतात याकडे शिवसेनेच लक्ष्य लागून राहिली आहे.