आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या ‘शक्तिस्थळा’वर शिवसेनेचा घाव; मुंबै बँकेवर प्रशासक नेमण्‍याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसेच्या ताब्यातील मुंबई जिल्हा सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच बँकेचे संचालक मंडळ बडतर्फ करण्यात येऊन प्रशासक नेमावा, अशी मागणी शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यात शिवसेना गटनेते आमदार सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर, विनोद घोसाळकर, दीपक सावंत, आनंदराव अडसूळ, अनिल देसाई, संजय राऊत यांचा शिष्टमंडळात सहभाग होता.

मुंबै बँकेतील घोटाळ्याची तक्रार दाखल आहे. त्यानंतर शासनाच्या दोन चौकशी पथकांनी व्यवहारांची तपासणी केली. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणात 412 कोटींचा घोटाळा झाल्याचे अहवालात नमूद केल्याची माहिती आमदार विनोद घोसाळकर यांनी दिली.