आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस सरकार बरखास्त करा, शिवसेनेची मागणी, मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दरबारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, नवी दिल्ली - फडणवीस सरकारने आवाजी मतदानाने सिद्ध केलेले बहुमत घटनाबाह्य असून हे सरकार बरखास्त करण्याची मागणी गुरुवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केली. काँग्रेसही शुक्रवारी राज्यपालांना भेटणार आहे.
विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घटनेतील कलम १६४ नुसार फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याची तक्रार राज्यपालांकडे केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ शुक्रवारी राज्यपालांकडे पुन्हा विश्वास ठराव मांडण्याची मागणी करणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते
पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते.
याचिका फेटाळली
भाजप सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा करणारी भारिप- बहुजन महासंघाचे नेते ज. वि. पवार यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ९ नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे होते, परंतु १० नोव्हेंबरपासून नवीन आमदारांचा शपथविधी सुरू झाला, असा दावा याचिकेत होता.