आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Gives Thanks To Pakistan For Demand Extremist Group In Saamna

शिवसेनेने मानले पाकिस्‍तानचे आभार, म्‍हटले -\'शुक्रिया पाकिस्तान !\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा पाकिस्‍तान विरोध देशभर चर्चेत आला आहे. यामुळे देशाची जागतिक पातळीवर बदनामी झाल्‍याची टीकाही भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी केली. पण, शिवसेनेने आज (सोमवारी) आपले मुखपत्र असलेल्‍या 'सामना'मधून पाकिस्‍तानचे आभार मानले. त्‍याला कारणही तसेच आहे. शिवसेनेला दहशहतवादी संघटना घोषित करून बंदी आणावी, अशी मागणी पाकिस्‍तानने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर केली. ही मागणी म्‍हणजे शिवसेनेचा गौवरच असून, पाकिस्‍तानने आम्‍हाला शिवसेनेस ‘महावीर चक्र’ प्रदान केले आहे, असे उपरोधिक उत्‍तर शिवसेनेने सामनाच्‍या अग्रलेखातून दिले. या अग्रलेखाचा संपादित अंश खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
म्‍हटले, शुक्रिया पाकिस्तान
'सामना'ने आपल्‍या अग्रलेखात म्‍हटले, 'भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची भाषा करणार्‍या पाकिस्‍तानचे ‘लाड’ ज्यांना करायचेत त्यांना करू द्यात, पण त्या पापात शिवसेना कधीच सहभागी होणार नाही. त्यामुळेच आता प्रत्यक्ष नवाज शरीफ सरकारनेही शिवसेनेवर बंदीची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे करून शिवसेनेस ‘महावीर चक्र’ प्रदान केले आहे. आमच्या देशाभिमानाचा हा गौरव व इतरांच्या षंढपणावर झालेले हे शिक्कामोर्तब आहे. शुक्रिया पाकिस्तान!' असे शिवसेनेने म्‍हटले.

पुढे वाचा, भाजप बनला पाकिस्‍तानचा रक्षणाकर्ता