मुंबई - शिवसेनेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला परवानगी दिली आहे.
काय आहे यंदाच्या दसरा मेळाव्याचे आकर्षण
राज्यात आणि केंद्रात युती असलेल्या शिवसेना आणि भाजपचे 'तुझे माझे पटेना तुझ्या वाचून करमेना' असे झाले आहे. या दोन्ही पक्षाची एकमेकांवर कुरघोडी सुरूच आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपचा कसा समाचार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.