आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा विरोध मावळला? शिवसेनेचे मंत्री उद्या शपथ घेणार, उद्धवही जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवाज शरीफ उपस्थित राहणार असले तरी, त्याने शिवसेनेला काही फरक पडत नाही. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्याच्या नरेंद्र मोदींच्या सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचा निर्णय झाला आहे. तसेच शिवसेनेचे मंत्रीही उद्या शपथ घेणार आहेत. याआधी शिवसेना नाराज असून शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरीफ यांच्या येण्याचे बहुतांश राजकीय पक्षांनी स्वागत केलेले असतानाच एनडीएतील प्रमुख घटकपक्ष असणा-या शिवसेनेमध्ये मात्र या मुद्यावर काय निर्णय घ्यायचा याबाबत शिवसेनेमध्ये मात्र संभ्रमाची स्थिती होते. शिवसेनेचे नेते या सोहळ्यास सहभागी होण्यास नकार देऊ शकतात, असे मत सुत्रांनी व्यक्त केले होते.

सुत्रांच्या मते शिवसेनेने त्यांचे मंत्री शपथ घेणार की नाही, .याबाबतही निर्णय झालेला नव्हता.
मात्र रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर या सर्व मुद्यांवरून पडदा उठला. शिवसेना पक्षाचा पाया हा पाकिस्तान विरोधावरच उभा असल्याचे मत तज्ज्ञ मांडतात. त्यामुळे भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेट मॅचचा मुद्दा असो, की पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात येण्याचा शिवसेनेने कायम त्यांना विरोधच केला आहे. पण यावेळी मात्र शिवसेनेने अपेक्षेपेक्षा वेगळा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे मंत्री सोहळ्यात शपथ घेणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा पाकिस्तानला असणारा विरोध मावळला आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळात पाकिस्तान आणि त्यासंदर्भातील सरकारच्या निर्णयांबाबत शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.