आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Highcomand Balasaheb Thakre Today Meet Shivsena Leader

शिवसेनाप्रमुख आज घेणार पदाधिका-यांची शिकवणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून महायुतीपुढे आव्हान उभे केल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात उतरावे लागले आहे. शिवसेनाप्रमुख गुरुवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिका-यांच्या मेळाव्याला संबोधित करणार असून निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या शिवसेना गीताच्या सीडीचे अनावरण करणार आहेत.
शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हातात असली तरी आजही शिवसेना कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्याच शब्दाला मान देतात. महाआघाडीने आव्हान निर्माण केल्याने आणि रिपाइं कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवता येत नसल्याने सत्ता राखण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना पुढे यावे लागले आहे. प्रचाराचा नारळ ठाणे येथे 11 फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत बाळासाहेब फोडणार असून प्रचाराचा समारोप बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तेच बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर 13 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
गटप्रमुखांच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले होते. मात्र पदाधिका-यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वत: बाळासाहेब ठाकरे पुढे आले आहेत. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता शिवसेनेतर्फे वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचाच असा निर्धार करावा यासाठी बाळासाहेब ठाकरे या पदाधिका-यांना प्रोत्साहित करणार आहेत.