आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ फेरबदलांवर शिवसेना संतप्त; संजय राऊत म्हणाले, \'एनडीएची हत्या झाली\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळ आल्यावर निश्चित आम्ही आमचे म्हणणे मांडू... - राऊत - Divya Marathi
वेळ आल्यावर निश्चित आम्ही आमचे म्हणणे मांडू... - राऊत
मुंबई - पीएम मोदींच्या मंत्रिमंडळ फेरबदलांवर शिवसेने संताप व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळ फेरबदल म्हणजे, एनडीएची हत्या असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एनडीए केवळ बैठकांपुरतीच मर्यादित बनली आहे. तसेच आम्ही काही मंत्रिपदासाठी हपापलेलो नाही असेही राऊत यांनी ठणकावले आहे. याचवेळी त्यांनी एनडीए आघाडीबद्दल फेरविचार करणार असल्याचे संकेत सुद्धा दिले आहेत. 
 
 
आणखी काय म्हणाले राऊत..?
- आम्ही काही मंत्रिपदासाठी हपापलेलो नाही. हा सगळाच केवळ आकड्यांचा खेळ आहे. वेळ येईल तेव्हा आम्ही आमचे म्हणणे निश्चितपणे मांडू असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 
- एनडीए केवळ कागदोपत्री आहे. जेव्हा भाजपला पाठिंबा हवा असतो तेव्हा त्यांना एनडीएची आठवण येते. राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि उपराष्ट्रतिपदाच्या निवडणुकीतच्या वेळी त्यांनी एनडीएला विचारले होते. 
- मात्र बाकी वेळी एनडीएचा विचार केला जात नाही. रविवारी झालेल्या झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळावे अशी मागणी होती. मात्र, भाजपने आपल्या मित्रपक्षाची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे, शपथविधी सोहळ्यावर सुद्धा शिवसेनेने बहिष्कार घातला होता. 
बातम्या आणखी आहेत...