आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंख फुंकला : शिवसेनेने दिला स्वबळाचा नारा, तर मुख्यमंत्री म्हणाले फायद्याची युती करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील नगरपालिका आिण नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजप यांच्यातील युतीवरून दिवाळीपूर्वीच फटाके फुटायला सुरुवात
झाली आहे.

सत्तेत राहूनही भाजपपासून चार हात दूर राहत धोरणात्मक विरोध करणाऱ्या शिवसेनेने गुरुवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये बोलताना ‘जेथे फायद्याची आहे तेथेच युती करा, अन्यथा स्वत: लढा’ असा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. यापूर्वी शिवसेनासुध्दा हेच करायची असे, सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.
कामाला लागा : उद्धव ठाकरे
राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीत पदाधिकारी आणि नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याने या निवडणुका स्वबळावरच लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. मात्र भाजपशी अजूनही युतीची शक्यता असून भाजपवर दबावाकरिताच स्वबळाचा नारा दिला जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला लागण्याचे आदेश दिले. युतीचा निर्णय आम्ही घेऊ, हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यानंतर गुरुवारी त्यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री आणि खासदार, आमदारांबरोबर निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेतली. तासभर चाललेल्या या बैठकीत स्वबळावर लढण्याबाबतच चर्चा झाल्याचे समजते. बैठकीस उपस्थित एका नेत्याने सांगितले, स्वबळावर लढल्यास फायदा होईल, असा सूर बुधवारच्या बैठकीत होता. गुरुवारी यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनीही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, भाजप प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे काम करतो परंतु चांगले काम केले तर भाजपावर मात करता हे पटवून देण्यासाठी ओरिसातील नवीन पटनाईक, तामिळनाडूत जयललिता, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आणि बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचे दाखले दिले.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली. परंतु काही गोष्टी गोपनीय असल्याने त्या सांगता येत नाहीत. युतीबाबत निर्णयाची घोषणा स्वतः उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन करतील.

शिवसेनेने युती तोडून दाखवावी
^भाजपशी युती तोडण्याचा शिवसेनेचा सूर दिसून येतो. मात्र, स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सरकारमधील युती तोडून दाखवावी. - राधाकृष्ण विखे पाटील, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते
पुढे वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री..
बातम्या आणखी आहेत...