आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पणजीत मनोहर पर्रीकरांचे मताधिक्क्य घटणे धक्कादायक; शिवसेनेचा भाजपला टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे खासदार संजय राऊत. - Divya Marathi
शिवसेनेचे खासदार संजय राऊत.
मुंबई/पणजी- भाजपचा पणजी मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे घटलेले मताधिक्क्य हे आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
 
राऊत म्हणाले की, पर्रीकर हे खरे तर बिनविरोध निवडून यायला हवे होते पण त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करून बरीच मते मिळवली. काँग्रेसने आणखी थोडा जोर लावला असता काँटे की टक्कर झाली असती. पणजीत काँग्रेसला बरीच मते मिळाली हे भाजपसाठी धक्कादायक आहे.
 
येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात उध्दव ठाकरे गोव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी शिबिर घेणार आहेत. आम्ही त्याची तयारी करत आहोत. आम्ही गोव्यात 2019 सालच्या लोकसभा निवडणुका लढवणार आहोत असेही राऊत यांनी जाहीर केले. मुंबईप्रमाणेच गोव्यालाही रुग्णवाहिका व मोबाईल दवाखाने देण्याचा विचार शिवसेना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...