आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुस्लिमांचा मताधिकार काढा’, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या लेखावरून गदारोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केल्यामुळे मोठे वादंग माजले आहे. व्होट बँक म्हणून मुस्लिमांचा होणारा वापर टाळण्यासाठी त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरच बंदी घातली पाहिजे, असे अजब तर्कट राऊत यांनी लिहिलेल्या लेखात मांडले आहे.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवेसी यांची ‘विषारी साप’आणि त्यांच्या पक्षाची ‘सापांचे वारुळ’ अशा शब्दांत संभावना केली आहे. राऊत यांच्या या भूमिकेवर सर्वच पक्षांनी कडाडून हल्ला केला असून लोकांत फूट पाडण्याचे हे षड‌्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
लोकांच्या भावना भडकावून त्यांच्यात फूट पाडण्याचे शिवसेनेचे हे कारस्थान आहे. अशा शक्तींना भारतीय समाजात अजिबात स्थान नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत वारंवार आश्वासने देऊनही अशा वादग्रस्त वक्तव्यांची हेतुत: पुनरावृत्ती केली जात असल्याचेही काँग्रेसने संजय राऊत यांचा निषेध करताना म्हटले आहे.