आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Leaders Meet To Sharad Pawar Over On Issue Of Balasaheb\'s Smarak

बाळासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी जातीने लक्ष घालू- शरद पवारांचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांचा कालच पहिला स्मृतिदिन झाला. यावेळी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातील लाखो लोक मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान, एका वर्षानंतरही बाळासाहेब यांच्या स्मारकाचा विषय संपलेला नाही. उलट दिवसेंदिवस तो चगळला जावू लागला आहे.
ठाकरे कुटुंबियांनी याबाबत अद्याप काहीही मत व्यक्त केले नसले तरी सेनेतील नेते मात्र याबाबत आग्रही आहेत. बाळासाहेबांचे थोरले सुपुत्र जयदेव यांनीही शिवाजी पार्कवर स्मारक नको असे सांगत पालिकेच्या जागेत नाहीतर नेत्यांनी खासगी जागा विकत घेऊन स्मारक उभारावे, असे सांगत नेत्यांचे कान टोचले आहेत.
दरम्यान, याचमुळे सेनेतील काही नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली. तसेच बाळासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी जातीने लक्ष घालू असे आश्वासन दिले. यावेळी सेनेच्या नेत्यांनी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. तसेच मुंबई पालिकेच्या महापौर बंगल्यावर हे स्मारक व्हावे, असा प्रस्ताव ठेवला आहे.
बाळासाहेबांच्या निधनानंतर पवारांनी आपल्या मित्राचे भव्य स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
वाचा आणखी पुढे या विषयी व जयदेव ठाकरे काय म्हणाले, स्मारकाबाबत....