आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Leads Towords To Save & Preserve INS Vikrant

विक्रांतला वाचविण्याची शिवसेनेची धडपड, पण मनसेच्या पोटात दुखू लागले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारने नकार दिल्यानंतर लिलावात जाणार्‍या ‘विक्रांत’ या युद्धनौकेला वाचवण्यासाठी शिवसेनेने निर्णायक पुढाकार घेतला असून लिलाव होण्यापूर्वी ही युद्धनौका मुंबई पालिकेने विकत घ्यावी अशी मागणी सेनेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. दरम्यान, महापौर सुनील प्रभू यांनीही विक्रांत वाचविण्यासाठी 100 कोटी देण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, मनसेने सेनेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी योग्य नाही, अशी पालिकेतील मनसेचे गटनेते देशपांडे यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्यानंतर सेनेने एका विधायक कामाला हात घातल्यानंतर मनसेच्या पोटात दुखू लागले आहे. एकीकडे राज ठाकरेंनी विक्रांत वाचवा, अशी ओरड करायची अन् पालिकेतील गटनेत्यानेच त्याला विरोध करायचा ही रणनितीही आता मनसेत शिरू लागली आहे काय अशी शंका यायला वाव आहे.
मुंबईतील प्रसिद्ध दादर या भागाला हेरिटेजचा दर्जा देण्यापेक्षा विक्रांत हे विमानवाहू जहाज वाचविण्यावर सरकारने भर द्यायला हवा, असे राज ठाकरेंनी तीन दिवसापूर्वी केले होते. मात्र, राज ठाकरेंच्या मनसेच्या करणी आणि कथनीतही आता फरक पडू लागल्याचे विक्रांतवरच्या घेतलेल्या भूमिकेमुळे स्पष्ट होत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले नाही. ते याबाबत काय भूमिका घेतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
पण मुंबई पालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी घेतलेली भूमिका म्हणजे नकारात्मक राजकारण करण्याच्या प्रवृत्तीचा भाग असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. राज्य सरकारने खर्च केलेला चालतो मग मुंबई पालिकेने केला तर बिघडले कुठे. दोन्ही ठिकाणी जनतेचाच पैसा आहे ना मग संदीप देशपांडे मुंबईकरांच्या आडून शिवसेनेवर का वार करीत आहेत. सेनेने प्रथमच याबाबत कौतूक करावे अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी महापौर सुनील प्रभू व राहुल शेवाळे यांच्यासारखे नवे नेतृत्त्व धडाडीचे काम करीत आहे हेच मनसेच्या डोळ्यात खुपू लागले आहे. सकारात्मक राजकारण करणारा पक्ष व त्यांचा नेता अशी प्रतिमा असलेल्या मनसे व राज ठाकरेंच्या प्रतिमेला नक्कीच तडा जात आहे.
आणखी पुढे वाचा... 100 कोटींची कशी तरतूद करणार आहे मुंबई पालिका विक्रांतला वाचविण्यासाठी...