आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छुपी युती करून लढणाऱ्यांपैकी अाम्ही नाही: शिवसेना आमदार अनिल परब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवसेना छुपी युती करून लढणाऱ्यांपैकी नाही. मुंबईतील कोणत्या ४२ वॉर्डांमध्ये काँग्रेसशी अामचे फिक्सिंग झाले आहे, ते शेलार यांनी पुढे येऊन सांगावे. मते मिळण्यासाठी उगाच हवेत आरोप करू नयेत,’ असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अामदार अनिल परब यांनी साेमवारी दिले. मुंबईत शिवसेना आणि काँग्रेसने ४२ जागी छुपी युती केल्याचा अाराेप भाजपचे मुंबई अध्यक्ष अामदार अाशिष शेलार यांनी केला हाेता. 

पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले, ‘शेलार यांना आमचे खुले आव्हान आहे की, त्यांनी कोणत्या ४२ वॉर्डांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये फिक्सिंग झाली आहे, ते सांगावे. भाजप जी आश्वासने देत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आजपर्यंत त्यांनी कोणती आश्वासने पाळली ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. शिवसेनेच्या बंडखोरांना पोलिस संरक्षण देत असून प्रत्येक पोलिस स्टेशनला भाजपच्या उमेदवारांना मदत करावी, असे आदेश आहेत. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप परब यांनी केला. 

साेमय्या बिल्डरधार्जिणे : शेवाळे 
डंपिंगग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे. किरीट सोमय्या वारंवार मुलुंड डंपिंग ग्राउंडचा प्लॉट आकृती बिल्डर्सला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. देवनार डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आगीबद्दल मला संशय आहे. देवनार डंपिंग ग्राउंडचे कंत्राट संजय काकडे आणि जय श्रॉफ यांच्या यूपीएल कंपनीकडे आहे. शेलार हे श्रॉफ यांना मदत करतात. ‘यूपीएल’चे पैसे मिळावेत यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे बैठकदेखील घेतली होती. योग्य वेळी ती उघड करू, असा अाराेपही खासदार राहुल शेवाळे यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...