आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांवरील सुनावणीदरम्यान पीएमएलए कोर्टात शिवसेना आमदार होते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरील सुनावणीवेळी आज शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हेसुद्धा उपस्थित होते. प्रकाश सुर्वे हे बराच वेळ छगन भुजबळांच्या अगदी शेजारी बसून होते.

 

 

भुजबळ कुटुंबीयही उपस्थित

आजच्या सुनावणीकरता संपूर्ण भुजबळ कुटुंबिय पीएमएलए कोर्टात हजर होते. पत्नी मीना भुजबळ, मुलगा पंकज, दोन्ही सुना विशाखा आणि शेफालीसह भुजबळांची नातवंडही कोर्टरुममध्ये उपस्थित भुजबळांच्या आजूबाजूला बसली होती. छगन भुजबळांच्या जामीन अर्जाला पीएमएलए कोर्टात ईडीच्यावतीने जोरदार विरोध व्यक्त करण्यात आला. पीएमएल कायद्यातील कलम 45 च्या सुधारणेतील तरतुदीनुसार भुजबळांचा नवा जामीन अर्ज हा असंविधानिक असल्याचा आरोप ईडीचे वकील हितेन वेणेगावर यांनी केला आहे.

कायद्यात जरी सुधारणा झाली असली तरी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या मुख्य गुन्ह्याची तीव्रता कमी होत नसल्याचा दावा आहे. तसेच पीएमएलए कायद्यातील कलम 24 अंतर्गतही आरोपीला जामीन देता येणार नाही, असे त्यांनी कोर्टात सांगितले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...