आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena mns Corporter Conflicts Over Shital Mahatre Issue At Mayor Office

शिवसेना-मनसेच्या नगरसेविकांचा महापालिकेत गोंधळ, शीतल म्हात्रे प्रकरणावरुन वादावादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रेप्रकरणी आता शिवसेना नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे. शीतल म्हात्रे या पालिकेतील महिला प्रतिनिधीला न्याय मिळावा म्हणून मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या विरोधात आज मुंबई महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले.
आंदोलनानंतर मनसेच्या नगरसेविकांनी महापौर सुनील प्रभू यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे उपस्थित होते. मुंबई महापालिकेतील महिला नगरसेविका सुरक्षित नाहीत. महिलांचे खच्चीकरण होत असल्याचे सांगत त्यासाठी तत्काळ विशेष सभा बोलवावी असा मनसेच्या महिला नगरसेवकांनी देशपांडे यांच्या उपस्थितीत महापौरांना प्रस्ताव दिला. त्यावर महापौरांनी सर्व बाबींची माहिती घेऊन सभा बोलाविण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र आम्हाला आताच त्याबाबत आश्वासन हवे असल्याची मनसेच्या महिला नगरसेविकांनी मागणी लावून धरली. त्यावेळी महापौरांसह शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांत बाचाबाची झाली. त्यामुळे दुपारी साडेतीनच्या सुमारास महापौर दालनातील वातावरण चांगलेच तापले.
शिवसेनेला आपल्या लोकप्रतिनिधीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दाखवून देण्यासाठी मनसेचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आम्ही या प्रकरणात लक्ष घातले असून, आमचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य ती पावले उचलत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगासह कोणीही नाक खुपसू नये व चिंता करू नये असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यावर महापौर यांनीही आपण याप्रकरणी जातीने लक्ष घालू व मुंबई पालिकेतील लोकप्रतिनिधी विशेषतः महिलांचे खच्चीकरण होत नाही ना याची माहिती घेऊ असे महापौर यांनी सांगितले आहे.