आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राेजा राेटी’प्रकरणी सेना खासदारांना क्लीन चिट, चपाती कोंबली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात राेजाचा उपवास असलेल्या कँटीन सुपरवायजरच्या तोंडात चपाती कोंबल्याप्रकरणी िशवसेना खासदार राजन विचारे यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट िदली अाहे. िदल्ली पोलिसांची ही कार्यवाही पुरेशी असल्याचे सांगत फडणवीस सरकारने हे प्रकरण गुंडाळल्याचे माहिती अधिकाराच्या उत्तरात उघड झाले आहे. फडणवीस सरकारने याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करून खासदारांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती, मात्र दिल्ली पोलिसांच्या क्लीन चिटचे निमित्त पुढे करून आता सरकारने आपली जबाबदारी झटकली आहे.
१७ जुलै २०१४ रोजी िदल्लीच्या महाराष्ट्र सदनातील स्वयंपाकगृहात हा प्रकार घडला होता. सुपरवायजर मुस्लिम असल्याने आणि रमजान काळात हा प्रकार घडल्याने या घटनेस धार्मिक रंग चढला होता. त्यानंतर कँटीन चालवणाऱ्या आयआरसीटीसी कंपनीने चौकशी समिती नेमली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कँटीन गैरव्यवस्थापना संदर्भातील चौकशीसाठी मुख्य सचिवांची समिती िनयुक्त केली होती.
दरम्यान, एप्रिल महिन्यात नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एक बैठक घेतली. त्या बैठकीत सदनातील चपाती राडा प्रकरणी दिल्ली पोलिसांची कार्यवाही पुरेशी असून राज्य सरकारने याप्रकरणी वेगळी कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजशिष्टाचार िवभागातील सूत्रांनी ‘िदव्य मराठी’ला सांगितले. कँटीन सुपरवायजरने पोलिसांत तक्रार िदली नव्हती, तरी सदर प्रकरणाची चौकशी शासनस्तरावर करण्याचा िनर्णय झाला होता.
चपाती कोंबली नाही
‘या प्रकरणाचे व्हिडिओ फुटेज आम्ही तपासले. त्यामध्ये िशवसेना खासदार राजन िवचारे सुपरवायजरच्या तोंडात चपाती कोंबत आहेत असे कुठेही िदसत नाही. त्यांनी चपाती केवळ तोंडाजवळ धरल्याचे िदसते आहे. सुपरवायजर अर्शद झुबेर याने घटना घडली त्या वेळी कंपनीने पुरवलेला गणवेश घातलेला नव्हता. तसेच त्याच्या शर्टावर त्याच्या नावाची पट्टी नव्हती. याप्रकरणी तीन वेगवेगळ्या तक्रारी नोंद आहेत. मात्र सदर प्रकरण दखलपात्र गुन्हा नसल्याने याप्रकरणी एफआयआर नोंद करण्यात आलेला नाही, अशी माहिती नवी िदल्लीचे पोलिस उपायुक्त िवजय सिंह यांनी राज्याच्या राजशिष्टाचार िवभागास ३१ जानेवारी २०१५ रोजी पाठवलेल्या पत्रात िदलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...