- या व्यक्तिचे नाव रत्नाकांत सागर असे असून तेही उमरगा येथील रहिवासी आहे.
- विशेष म्हणजे खासदार गायकवाड हे टी-शर्ट आणि जीन्स अशा पेहरावात फिरताना दिसतात तर रत्नाकर सागर हे गायकवाडांसारखाच कुर्ता-पायजमा घालून सर्वत्र वावरतात.
- इतकेच नाही तरी स्वत: गायकवाड हे रत्नाकांत यांची ओळख 'साहेब' अशी करुन देतात. गायकवाड स्वत:ला साहेबांचा सेक्रेटरी असल्याचे लोकांना सांगतात.
- रत्नाकांत सागर आणि खासदार गायकवाड हे दोघे 'सेम टु सेम' दिसतात.
- रत्नाकांत यांनी सांगितले की, ते मागील अनेक वर्षांपासून खासदार गायकवाड यांच्यासारखा पेहराव करत आहे.
- खासदार गायकवाड यांची आपण कॉपी करत असल्याचे रत्नाकांत यांनी सांगितले आहे.
सेल्फीसाठी रत्नाकर यांना केले जाते पुढे...- रवींद्र गायकवाड हे एअर इंडियाच्या कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकारणी चांगलेच प्रकाशझोतात आले आहे. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा अनेकजण आग्रह धरतात. तेव्हा गायकवाड हे स्वत: रत्नाकार सागर यांना पुढे करतात. लोक त्यांना खासदार गायकवाड समजून त्यांच्यासोबत सेल्फी काढतात.
- गायकवाड यांच्या मागे मागील काही महिन्यांपासून मीडियाचा समेरिरा लागला आहे. त्यातुन स्वत:ची सुटका करण्यासाठी त्यांनी नवी शक्कल लढवली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा... हुबेहूब खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासारखे दिसणारे रत्नाकांत सागर यांचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)