आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रिया सुळेंना घेण्याची नरेंद्र मोदींची इच्छा- संजय राऊतांचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले होते त्यावेळी मोदींना पवारांचे संग्राहलय दाखवताना सुप्रिया.... - Divya Marathi
2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले होते त्यावेळी मोदींना पवारांचे संग्राहलय दाखवताना सुप्रिया....
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार कन्या सुप्रिया सुळे या खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या केंद्रिय मंत्रिमंडळात हव्यात, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच ही माहिती आपल्याला खुद्द शरद पवार यांनीच एका भेटीदरम्यान दिली असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत शिवसेनेचे खासदार असले तरी ते सेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादकही आहेत. ते 'सामना'त दर रविवारी रोखठोक सदर लिहतात. या रविवारच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांनी हा जाहीर गौप्यस्फोट केला आहे.
 
नुकताच केंद्रिय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावर भाष्य करणारा लेख संजय राऊतांनी 10 सप्टेंबरच्या रोखठोक सदरात लिहला आहे. 'राजकीय पंडित आपटले, मोदी-शहांवर आता जुगार नको!' या लेखात संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंबाबत दावा केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या केंद्रिय मंत्रिमंडळात शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पेरल्या होत्या. मात्र, अखेर त्या अफवाच ठरल्या होत्या. याबाबतचा एक किस्सा संजय राऊतांनी रोखठोकमध्ये सांगितला आहे.
 
संजय राऊत लिहतात, माझी नुकतीच शरद पवारांशी भेट झाली. त्यावेळी देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. त्यावेळी मी पवारांना भाजपच्या गळाला लागला आहात काय असा सवाल केला. त्यावेळी पवारांनी या केवळ अफवा आहेत अशा बातम्या म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे. होय, हे खरं आहे, मोदी एकदा मला म्हणाले होते की, सुप्रिया सुळे मला मंत्रिमंडळात हव्या आहेत. तेव्हा सुप्रिया माझ्यासोबतच होती. तिने मोदींना त्यावेळी तोंडावरच सांगितले की, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन.''
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, संजय राऊतांनी 'रोखठोक'मध्ये जे लिहलं ते जसेच्या तसे....
बातम्या आणखी आहेत...