आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena MP Sanjay Raut Comment On Udhav And Raj Thackeray Dispute Issue

\'ठाकरे बंधुंना एक‍त्र आणण्यासाठी नितीन गडकरींनी प्रयत्न करावे\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाशी युतीच्या प्रस्तावाचे स्वागतच करू, असे स्पष्ट करतानाच टाळी एका हाताने वाजत नाही. हा निर्णय दोन्ही बाजूंनी व्हावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने मुखपत्र 'सामना'मधून छापून आलेल्या मुलाखतीत एकत्र येण्यावर भाष्य केले. कारण उद्धव ठाकरेंचे मन स्वच्छ आहे. म्हणूनच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मैत्रीचा हात केला होता. परंतु राज ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये उद्धव यांचे संकेत उडवून लावले होते. भाजपचे माजी अध्यक्ष न‍ितीन गडकरी हे शिवसेनेचे हितचिंतक आहेत. त्यांना आत्मविश्वास असेल तर त्यांनी राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.

भाजप माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यावरच बोलताना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले आहे. राज-उद्धव एकत्र यावे अशी बाळासाहेब ठाकरेंचीही इच्छा होती. तसेच राज्यातील मराठी माणसाच्या हितासाठी दोघेही लढत आहेत. त्यामुळे ही लढाई दोघांनी हातात हात घेऊन लढावी, अशी इच्छा नितीन गडकरींनी तेव्हा व्यक्त केली होती.