आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Mp Vinayak Raut Critics On Narayan Rane

चेंबूरमधील कोंबडीचोर जुहूतील 9 मजली इमारतीत कसा राहतो? राऊतांची राणेंवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे कसलेही आव्हान नाही. राणेंचं आव्हान असूच शकत नाही. या निवडणुकीत एमआयएम दुस-या तर राणे तिस-या क्रमांकावर राहतील अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना चिथावले आहे. चेंबूर नाक्यावरचा कोंबडीचोर जुहूतील 9 मजली इमारतीत राहतोच कसा असा सवालही राऊतांनी विचारला आहे.
वांद्रे (पूर्व) निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. आज व उद्या शनिवार-रविवारची सुटी असल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरु केला आहे. कोकणातील खासदार विनायक राऊत यांनीही आज वांद्रेतील काही भागात प्रचार केला. त्यावेळी बोलताना राऊतांनी राणेंवर प्रहार केला. नारायण राणेंनी दोन दिवसापूर्वी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. मुंबई महापालिका हे उद्धव ठाकरेंचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याची टीका राणेंनी केली होती. त्याला राऊतांनी आज प्रत्त्युत्तर दिले. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी चेंबूर नाक्यावर कोंबडीचोर असणारा आज जुहू-चौपाटीसारख्या पॉश इलाक्यात 9 मजली इमारतीत कसा राहतो याचे उत्तर द्यावे असे सांगितले. राणेंकडे आलेला पैसा जादूतून कमावला की तेलगी प्रकरणातून कमविला ते सांगावे. राणेंसारखा स्वार्थी व खादाड वृत्तीचा माणूस दुस-याला शहाणपण शिकवतो याचेच आश्चर्य वाटते पण आता तो त्यांचा धंदाच झाला असल्याची टीकाही राऊतांनी केली.
एमआयएम हे भाजप-शिवसेनेचे पिल्लू असल्याची टीका केल्याच्या राणेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना राऊत म्हणाले, वांद्रे (पूर्व) पोटनिवडणूक एमआयएमने लढवू नये म्हणून राणेंनी त्यांचे हातपाय धरले. पण एमआयएमने ऐकले नाही. तरीही स्वार्थी राणेंनी दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांकडून एमआयएमला कोट्यावधीची ऑफर दिली. एमआयएममुळे आपला पराभव होणार याची खात्री झाल्याने ते भाजप-शिवसेनेचे पिल्लू असल्याचे बरळत आहेत. वांद्रेत नारायण राणेंचे डिपॉझिट जप्त होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे राऊतांनी सांगितले.