आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याचे दर घसरले; निर्यातमूल्य कमी करण्यासाठी शिवसेनेचे संसदेबाहेर आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संसदेबाहेर आंदोलन करणारे शिवसेनेचे खासदार... - Divya Marathi
संसदेबाहेर आंदोलन करणारे शिवसेनेचे खासदार...
नवी दिल्ली/नाशिक- कांद्यांचे दर पडल्याने हवालदिल झालेल्या शेतक-यांनी नाशिकमधील लासलगाव व मनमाडमधील कांद्याचे लिलाव बंद पाडल्यानंतर शिवसेनेने या मुद्यांवरून राजधानी दिल्लीत आंदोलन केले. कांद्याचे निर्यातमूल्य कमी करावे अशी मागणी करीत शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर निदर्शने केली. यावेळी शिवसेनेच्या खासादारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या.
आज सकाळी संसद भवन परिसरात ‪‎शिवसेना‬ खासदारांनी कांदा निर्यात मूल्य कमी करावे आणि कांद्याला योग्य भाव द्यावा असे सांगत निदर्शने केली. ‪शेतकरी‬ जगला तर देश जगेल अश्या घोषणा देऊन संसद भवन परिसर या खासदारांनी दणाणून सोडला. या वेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, शिवाजी आढळराव पाटील, आनंदराव आडसुळ, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, भावना गवळी, कृपाल तुमाणे, रवी गायकवाड, चंद्रकांत खैरे आदी उपस्थित होते.
शिवसेना खासदारांनी बुधवारीही संसदेबाहेर केले होते आंदोलन... वाचा पुढील स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...