आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्ग्यात घुसाल तर चपलेचा प्रसाद, तृप्ती देसाईंना शिवसेना नेता अराफतची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भूमाता महिला ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाईंना शिवसेनेचे मुस्लिम नेते हाजी अरफात शेख यांनी धमकी दिली आहे. जर हाजी अली दर्ग्यात घुसण्याचा प्रवेश केला तर चप्पलांचा प्रसाद मिळेल असा इशारा शेख यांनी दिला आहे. देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश करण्याबाबत जी भूमिका घेतली आहे त्यामुळे मुस्लिम खवळले आहेत असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना नेते हाजी अराफत शेख यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दिलेला इशारा हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. ती शिवसेना पक्षाची भूमिका नाही असे स्पष्टीकरण शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.
आपल्याला माहित असेलच की, तृप्ती देसाई यांनी येत्या 28 एप्रिल रोजी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांसमवेत दर्शनासाठी प्रवेश करणार असल्याचे मागील आठवड्यात सांगितले होते. तसेच त्यापूर्वी हाजी अली ट्रस्ट व्यवस्थापनेशी चर्चेची आमची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, देसाई यांच्यासोबत कसलीही चर्चा होऊ शकत नाही असे सांगत ट्रस्टने नकार दिला आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर येथील गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले. यावेळी देसाईंना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याने भाविक नाराज झाले होते.
मुस्लिम समुदायात प्रचंड संताप-
महिलांना घेऊन हाजी अली दर्ग्यात घुसण्याचा इशारा देणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईर्ंविरुद्ध मुस्लिम मौलानांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. महिलांनी दर्ग्यात प्रवेश करणे इस्लामी कायदा शरीयतला मान्य नाही. त्यामुळे देसाईंसह कोणत्याही महिलेला दर्ग्यात पाय ठेवू देणार नाही, अशा इशाराही मौलवींनी दिला आहे. इस्लाममध्ये महिलांना दर्गा आणि कब्रस्तानात प्रवेशास मनाई आहे आणि आमच्या शरीयत कायद्यात कुणी ढवळाढवळ केली तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा ‘जमीएतुल उलेमा मुंबई’चे अध्यक्ष मौलाना अब्दुससलाम कासमी यांनी दिला आहे. अधिकाराच्या नावाखाली इस्लामी कायद्याचे उल्लंघन करू इच्छिणार्‍या देसाई यांनी आधी रस्त्यावर मुलांना घेऊन भीक मागणार्‍या महिलांना त्यांचा अधिकार मिळवून द्यावा, असे आव्हान ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे मुफ्ती अब्दुर्रहमान मिल्ली यांनी दिले आहे.
पुढे वाचा, लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्यापेक्षा त्यांनी सामाजिक हिताचे आणि लोकोपयोगी उपक्रम हाती घ्या- शेख यांचा देसाईंना सल्ला...