आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena News Ragarading Seat Sharing Of Mahayuti

'...लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण'; शिवसेना 161 जागांवर ठाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेने जागावाटपाबाबत ताठर भूमिका घेतली आहे. 161 पेक्षा एकही कमी जागा घेणार नाही. भाजपला 110 जागा तर उर्वरित चार घटकपक्षांना केवळ 17 जागाच देण्यास शिवसेना तयार असल्याचे कळते आहे.
दरम्यान, भाजपने किमान 130 जागा मिळायला हव्यात असा हट्ट कायम ठेवला आहे. तर, घटकपक्षांनाही किमान 25 जागा हव्या आहेत. यामुळे महायुतीत जागावाटपाचा यक्ष प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे. यंदा मुख्यमंत्रीपद पटकावायचेच असा चंग भाजपने बांधल्यानंतर सेनेने धुर्त व सावध नितीचा अवलंब करीत पक्षसंघटना मजबूत करण्याचे डाव खेळला आहे. विविध पक्षातील नेते सेनेत आणण्याचे डावपेच खेळून सेनेने भाजपला बॅकफूटवर ढकलण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

शिवसेनेची भाष्य म्हणजे, लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण...
महायुतीत मोठा भाऊ असलेला शिवसेना महायुतीतील जागावाटपाबाबत भाष्य करीत नाही मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपातील वादाबाबत अग्रलेख लिहून स्वत:चेच हसे करून घेत आहे. शिवसेनेची हे भाष्य म्हणजे 'लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण' या उक्तीची प्रचिती आणून देणारे आहे. शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत सडकून टीका करताना म्हटले आहे की, महाराष्ट्रात जो तो स्वबळाची बेडकी फुगवून दाखवतो आहे व त्यामुळे राज्यातील जनतेची चांगलीच करमणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांत तर रोजचाच कलगीतुरा सुरू आहे व दोन्ही पक्षांनी 288 जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे, असे सांगत सडकून टीका केली आहे.
पुढे आणखी वाचा, काँग्रेस-राष्ट्रवादीवर शिवसेनेने अग्रलेखातून काय टीका केली आहे...