आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना नरमली: महायुती हिंदुत्वाचा अथांग सागर, विचारांची गाठ सुटणार नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: उद्धव ठाकरे)
मुंबई- महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती हा राजकीय उथळपणाचा खळखळाट नसून हिंदुत्वाचा अथांग सागर आहे. हरयाणा, बिहारात हिंदुत्ववादी विचारांची गाठ नसल्यानेच तेथे गाठ सुटली. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांची गाठ पक्की असल्यानेच ती सुटणार नाही. याचे भान शिवसेनेबरोबर भाजपलाही आहे, अशी नरमाईची भूमिका घेतली आहे. तरीही हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप जर कुणी करतील त्यांना जनता धडा शिकवेल, अशी सूचक इशारा शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे.
शिवसेनेने आज यावर अग्रलेख लिहून भाजप-सेनेची महायुती अभेद्य राहील असे म्हटले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनेची मुळे महाराष्ट्राच्या जमिनीत घट्ट रुजली आहेत. आमचेही पाय नेहमीप्रमाणे जमिनीवरच आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरही शिवसैनिकांच्या डोक्यात अजिबात हवा गेलेली नाही. विधानसभा जिंकण्यासाठी ते जरा जास्तच जोमाने कामास लागले आहेत. याची जाणीव आमच्या मित्रांना व राजकीय दुश्मनांनाही असायलाच हवी. आमचे मित्रवर्य ‘भाजप’ही जोरदार कामास लागले आहेत व त्याचा फायदा ‘युती’ म्हणून दोघांनाही होणारच आहे, असे म्हटले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या अशा उथळ राजकारणाचा खळखळाट सुरू असला तरी हा खळखळाट म्हणजे कृष्णा-कोयनेचा प्रवाह नाही. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती हा राजकीय उथळपणाचा खळखळाट नसून हिंदुत्वाचा अथांग सागर आहे व या सागरमंथनातून निर्माण झालेले हलाहल शिवसेनेने अनेकदा पचवले आहे. हिंदुत्ववादी विचारांशी प्रतारणा करण्याचे पातक आमच्या हातून कधी घडले नाही. आम्हाला सत्ता हवी आहे ती हिंदुत्वाचा एल्गार करण्यासाठी व अखंड महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी. राजकीय मतलबापोटी आम्ही कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही आणि करणारही नाही. आमचा विचार पक्का आहे. शिवसेना-भाजपचे हिंदुत्ववादी व अखंड महाराष्ट्रवादी राज्य यावे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
हरयाणाप्रकरणी शिवसेनेची सपशेल माघार, वाचा पुढे...