Home »Maharashtra »Mumbai» Shivsena On Ramnath Kovind, BJP Candidature

दलित मतांसाठी दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही - उद्धव ठाकरे

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 21:22 PM IST

  • दलित मतांसाठी दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही - उद्धव ठाकरे
मुंबई -भाजप केवळ दलितांची मते घेण्यासाठी दलित राष्ट्रपती देणार असेल तर शिवसेनेचा त्यास विरोध राहणार आहे. राष्ट्रपतिपदासाठी आपले उमेदवार म्हणून रामनात कोविंद यांचे नाव जाहीर केले. त्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली ही भूमिका मांडली आहे. यासोबतच, शिवसेना कुणाला पाठिंबा देणार यावर आपण मंगळवारी बोलणार असल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आप-आपली गणिते लावत आहेत. अशात शिवसेनेने यासंदर्भात आपली नेमकी भूमिका मंगळवारी मांडणार असे ठरवले आहे. विशेष म्हणजे, भाजपने उमेदवार जाहीर करण्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वी भाजप अध्यक्ष शहा यांनी मुंबईत ठाकरेंची भेट घेतली. तरीही या भेटीतून काहीच फलित झाले नसल्याचे सोमवारी दिसून आले आहे. भाजपने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी आपली मूठ उघडलेली नाही. भाजप केवळ दलित समाजाची मते मिळवण्यासाठी दलित राष्ट्रपती करू पाहत असेल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही असे त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी कोविंद यांच्या उमेदवारीवर आपली नेमकी भूमिका काय हे मंगळवारी सांगणार असेही म्हटले आहे. यानंतरही राष्ट्रपतिपदासाठी आपण मोहन भागवत यांचे नाव हिंदू राष्ट्र संकल्पनेसाठी पुढे केले होते असेही ते पुढे म्हणाले.

Next Article

Recommended