आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जो जीता वही सिकंदर’; अहमद पटेलांच्या विजयानंतर शिवसेनेकडून अभिनंदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे खासदार संजय राऊत. - Divya Marathi
शिवसेनेचे खासदार संजय राऊत.
मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पराभव करत राज्यसभेत पोहोचलेले काँग्रेसचे अहमद पटेल यांचे शिवसेनेने अभिनंदन केले आहे. ‘जो जीता वही सिकंदर’असे म्हणत पटेल यांना शिवसेनेने शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. काँग्रेसला हादरा देण्याचे भाजपचे मनसुबे होते. पण पटेल यांच्या विजयाने भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले. रात्री उशीरा मतमोजणी झाली आणि यात अहमद पटेल यांचा विजय झाला. पटेल यांच्या विजयाने भाजपला हादरा बसला आहे. अहमद पटेल यांच्या विजयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्यासारखेच मी अहमद पटेल यांचेही अभिनंदन करतो. ‘जो जीता वही सिकंदर असे म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...