आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; उद्धव ठाकरेंचे प्रकल्प विरोधकांना आश्वासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण रिफायनरी विरोध संघर्ष संघटनेला दिले आहे. कोकण रिफायनरी विरोध संघर्ष संघटना पदाधिकारी आणि नाणार ग्रामस्थांशी उद्धव ठाकरे यांनी आज चर्चा करून प्रकल्पाला त्यांच्या विरोधाची कारणे जाणून घेतली.

 

कोकणवासियांचा रिफायनरीला विरोध

रत्नागिरीतील वादग्रस्त नाणार रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेची बैठक मातोश्रीवर झाली.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांना दूर ठेवण्यात आले होते. पण नंतर त्यांना बोलवून घेण्यात आले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...