आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Praises British Pm David Cameron Over Learn English Otherwise Ready To Deportation

मोदीजी, मदरशांतील उर्दू-अरेबिकमधील शिक्षण पद्धती बंद करा- शिवसेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मदरसे हे आतंकवादी बनवण्याचे कारखाने होत आहेत व धार्मिक शिक्षणाचा अट्टहास मुसलमान पोरांना पुन्हा त्याच डबक्यात टाकत आहे. त्यामुळे हे मदरसे व तेथील उर्दू-अरेबिकमधील शिक्षण बंद करून मुस्लिम युवकांना हिंदी व इंग्रजी भाषेतून शिक्षण द्यायला हवे अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. यासोबत ब्रिटन सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीतरी शिकायला हवे असा टोलाही हाणला आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना देशातून हाकलून देण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. शिवसेनेने या मुद्यांवर भाष्य करीत भारतातील स्थितीवर प्रकाशझोत टाकला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की,आपले पंतप्रधान, मंत्री आणि सर्वच राजकारणी परदेशांमध्ये जात-येत असतात. तेथील उद्योग, व्यापार, कला वगैरे गोष्टी देशात आणण्याचे करारमदार ते करीत असतात. त्या येतीलसुद्धा, पण त्या देशांकडे देशाच्या दुश्मनांविरोधात लढण्याची, त्यांची धर्मांधता आणि अतिरेकी चळवळींना चिरडून टाकण्याची जी हिंमत आणि जिद्द आहे ती कुठून आणणार? ती काही उधारीवर आणता येणार नाही. ती आपली आपल्यालाच दाखवावी लागेल. मुसलमानांच्या बाबतीत जग काय विचार करीत आहे ते इंग्लंडमधील एका धाडसी निर्णयाने दिसून आले. इच्छा असेल तर मार्ग निघेल असे म्हणतात आणि राज्यकर्ता ढोंगी नसेल व हिंमतबाज असेल तर दुश्मनांच्या छातीत धडकी भरते. प्रत्येक वेळी हाती बंदुका व तलवारी घेऊनच देशाच्या दुश्मनांशी लढायला पाहिजे असे नाही; तर लहानसहान निर्णयांतूनही दुश्मनांची कोंडी करून त्यांना घायाळ करता येते हे युरोप-अमेरिकेसारखी राष्ट्रे आपल्या कृतीतून दाखवत असतात, अशा शब्दांत कॅमेरून यांच्या निर्णयाचे समर्थन केले.
कॅमेरून यांचे कौतूक करताना अग्रलेखात म्हटले आहे की, सध्या त्या इस्लामिक स्टेटच्या धर्मांध दहशतवाद्यांनी मुसलमानांस वेडे केले आहे. कॅमेरून यांनी भविष्यातला धोका ओळखला व देशाच्या अस्मितेसाठी व सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे.इंग्रजीचा गंध नसलेल्या या मुसलमान महिलांच्या बुरख्याखालील मेंदूत इस्लामिक स्टेटचा विषारी विचार पटकन घुसू शकतो व आईच्याच डोक्यात हे विष गेल्याने मुलांनाही त्या ‘इस्लामिक स्टेट’च्या शौर्यगाथा सांगून नवे विष निर्माण करतील, असा हा साधा विचार मोजक्या शब्दांत डेव्हिड कॅमरून यांनी मांडला आहे.इंग्लंडमध्ये राहूनही अनेक महिला त्यांचा कर्मठपणा सोडायला तयार नाहीत. उर्दू व अरेबिक भाषेतून त्या व्यवहार करतात व अशा अशिक्षित, अडाणी मुसलमान महिलांच्या डोक्यात इस्लामिक स्टेटचा विचार घुसवून आतंकवादी आपले नेटवर्क वाढवतात असे अग्रलेखात म्हटले आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने मोदींना काय सल्ला दिला आहे...