आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने सुरुवात केली, आम्ही शेवट करू; भाजपचे आशिष शेलार यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुलुंडमध्ये महापालिकेतील माफियाराजच्या रावणाच्या दहनाचा भाजपने कार्यक्रम आयोजित केला होता. महत्त्वाचे म्हणजे भाजपचा हा अधिकृत कार्यक्रम होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात घुसून रावणाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. यात भाजपच्या महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या आहेत. शिवसेनेने सुरुवात केली असून याचा शेवट आम्ही करु, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे. तसेच ही लढाई यापुढे आणखी तीव्र केली जाईल, असेही ते म्हणाले.

शेलार यांनी बुधवारी सकाळी सोमय्या यांची भेट घेतली. महापालिकेतील भ्रष्ट्राचार, माफिया यांच्याविरोधातील लढाईत पक्ष आपल्यासोबत असल्याचा शेलार यांनी सोमय्या यांना विश्वास दिला. त्याचप्रमाणे शेलार यांनी भाजपच्या जखमी कार्यकर्त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्याची विचारपूसही केली.

पुढील स्लाइडवर वाचा, उद्धव ठाकरे म्हणाले, आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नसेल तर ते जातीपातीच्या आधारावर दिले पाहिजे!
बातम्या आणखी आहेत...