आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Raises Some Question Over Army Power & Pathankot Attack

भारताचे लष्करी सामर्थ्य अफाट, मग पठाणकोटसारखे हल्ले का होतात?- शिवसेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राजपथावरील पथसंचलनात प्रथमच विदेशी सैन्याने भाग घेतला. भारताचे लष्करी सामर्थ्य किती अफाट आहे ते या निमित्ताने दिसले. पण हे सामर्थ्य पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा कुठे लुप्त होते? राजपथावरील लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन खरोखरच नेत्रदीपक होते, पण त्याचा उपयोग काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना'त 'आहे नेत्रदीपक तरी...' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहला आहे. देशाचा 67 वा प्रजासत्ताकदिन फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांच्या उपस्थितीत पार पडला. राजपथावर जो नेत्रदीपक सोहळा पार पडला त्यात आपल्या लष्करी सामर्थ्याचे भव्यदिव्य प्रदर्शन झाले. यात भारताची लष्करी ताकद मोठी असल्याचे म्हटले आहे. पण त्याचवेळी पठाणकोटसारखे हल्ले का होतात व आपण ते सहन का करतो असा प्रश्न अग्रलेखात उपस्थित केला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की,राजपथावरील पथसंचलनात प्रथमच विदेशी सैन्याने भाग घेतला. भारताचे लष्करी सामर्थ्य किती अफाट आहे ते या निमित्ताने दिसले. हे एकप्रकारे राष्ट्राचेच सामर्थ्य असते. पण हे सामर्थ्य पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा कुठे लुप्त होते? असा प्रश्‍न सामान्य जनांना पडत असतो. दुश्मनांशी व अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या जवानांना ‘शौर्य’ पुरस्काराने सन्मानित केले जाते व आजच्या दिवशी शहीदांची कुटुंबे अश्रूभरल्या नयनांनी आपल्या पतीचे, पित्याचे मरणोत्तर शौर्यपदक स्वीकारत असतात. हे दृश्य अभिमानाचे तितकेच काळीज पिळवटून टाकणारे असते. कश्मीर खोरे असेल, पठाणकोट असेल, मुंबईवरील हल्ले असतील आमचे जवान लढत आहेत, पण पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया का थांबत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे.
पुढे आणखी वाचा...