आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरजे मलिष्कावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा; शिवसेनेची मुंबईच्या महापालिका आयुक्तांकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरजे मलिश्का. - Divya Marathi
आरजे मलिश्का.
मुंबई- आरजे मलिष्का हिच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. मुंबई महापालिकेची बदनामी कारवाई करण्याची मागणी याबाबत दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. 'मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय’ या गाण्यामुळे मुंबई महापालिकेची बदनामी झाल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
 
शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजॉय महेता यांची भेट घेऊन कायदेशीर कारवाई करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बीएमसीच्या बदनामीचं गाणं करणे ही निंदनीय गोष्ट असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. सरवणकर आणि घोले यांनी पालिका आयुक्तांकडे याबाबत पत्र दिले आहे.