आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध; \'राज्यपाल परत जा\'च्या घोषणांनी दणाणला परिसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - विश्वासमत प्रस्तावावर आंदोलन करताना कॉंग्रेसचे नेते.)
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस आज दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाले. सुरुवातीला विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली, त्यानंतर आवाजी मतदानाने सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्याला विरोधीपक्ष शिवसेना आणि काँग्रेसने विरोध करत मतविभाजनाची (डिव्हिजन ऑफ व्होट) मागणी केली. विश्वासदर्शक ठरावानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, सरकारने विधानसभेत पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडावा, असे आवाहन राज्यपालांकडे करणार असल्याचे दोन्ही पक्षांनी म्हटले आहे.
भाजप सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप विधानसभा विरोधीपक्षनेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सरकार घटनेची पायमल्ली करत असल्याचीही टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
विश्वासदर्शक ठराव नियामानुसारच- विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे
भाजप सरकारने विधानसभेत मंजूर करण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव नियामानुसारच असल्याचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. घटनेच्या नियमानुसार विश्वासदर्शक ठराव विधानसभेत पारित करण्यात आला तेव्हा विरोधी पक्षांनी 'पोल' मागितला नाही. त्यामुळे ठराव मंजूर झाला. ही चूक नसल्याचेही हरीभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.

विरोधक आमदारांना नियम माहीत नसावेत- विनोद तावडे
तसेच राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, विश्वासदर्शक ठराव हा नियमानुसारच आहे. शिवसेना तसेच कॉंग्रेसच्या आमदारांनी योग्य वेळी पोल मागितला नाही. विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यानंतर 'पोल पोल' म्हणत मतविभागणाची मागणी करावी लागते, असा नियम आहे. कदाचित शिवसेना आणि कॉंग्रेसच्या आमदारांना हा नियम माहित नसेल, असाही टोला विनोद तावडे यांनी लगावला. विनोद तावडे विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलत होते. योग्य वेळी पोल मागितला नाही. पोल पोल म्हणत मतविभाजनाची मागणी करावी लागते, असा नियम आहे.
विरोधी पक्षांनी वेळेत 'पोल' न मागितल्याने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. विधानसभा सचिवांनी यात कोणतीही चूक न झाल्याचे म्हटले आहे. विधानसभेचे कामकाज आजचे (बुधवार) कामकाज नियमानुसारच झाल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

दुपारी चार वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण होणार आहे. यावेळी शिवसेना सदस्य गोंधळ घालण्याची शक्यता आहे. विश्वासमत प्रस्तावावर विद्यासागर काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याला विरोध केला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सरकारने घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'विधानसभेत भाजपने नियम धाब्यावर बसवून, घटनेची पायमल्ली करुन विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेतला. भाजपने मतदान घ्यायला हवे होते. विधानसभा अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी नियमबाह्यरित्या काम करत आवाजी मतदान करुन लोकशाहीची हत्या केली आहे. त्यांच्या या निर्णयाचा शिवसेना धिक्कार करते'
कदम म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांना नियम चांगले कळतात त्यांनी नियम क्रमांक 25 नुसार मतदान घ्यायला पाहिजे होते. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळाले असते, की या सरकारला कोणाचा पाठिंबा आहे.' भाजपच्याच 40 सदस्यांचा या सरकारला विरोध होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. रामदास कदम यांनी भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा बहुमत सिद्ध करुन दाखवावे असे आव्हान दिले आहे.
विधानसभेच्या इतिहासातील काळा दिवस
विधानसभेत सरकारचा विश्वासदर्शक ठराव मतदानाद्वारेच पारित झाला पाहिजे अशी पंरपरा आहे. भाजप सरकारने असे न करता आवाजी मतदान घेतले ते घटनाबाह्य आहे. याविरोधात काँग्रेस राज्यपालांकडे दाद मागणार आहे. असे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सरकारने केलेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. हे सरकार घटनाबाह्य असल्याचे चव्हाण म्हणाले.

लोकशाहीची हत्या
विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर विरोधीपक्षाने मतदानाची मागणी केली होती, असे असताना विधानसभाध्यक्षांनी आवाजी मतदानाचा विषय ठेवला. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यभ माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

ते म्हणाले, 'विधानसभाध्यक्षांनी पक्षपातीपणा केला आहे. विरोधीपक्षातील सदस्यांनी केलेली मतदानाची मागणी फेटाळत पारित केलेला विश्वासदर्शक ठराव घटनाबाह्य आहे. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते, तेव्हा देखील त्यांनी मतदान घेतले होते. आणि सरकार पडल्यानंतर राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्याच पक्षाच्या सरकारने महाराष्ट्र विधानसभेत लोकशाहीची हत्या केली आहे.'
पुढील स्लाईडवर वाचा, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी यावर काय म्हणाली....