आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या गटनेतेपदावर शिंदे, सरनाईक यांचा डोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनात गटनेते सुभाष देसाई यांना न सांगताच शिवसेनेच्या काही आमदारांनी आंदोलने केली होती. यामुळे देसाई नाराज झाले होते. आता पावसाळी अधिवेशनात जर आमदार ऐकणार नसतील तर आपल्याला गटनेते पदच नको, अशी भावना देसाई यांनी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आक्रमकपणा दाखवून गटनेतेपद मिळवण्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थसंंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदे, विनोद घोसाळकर, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांनी आपला एक गट बनवून सभागृहात व बाहेरही आंदोलने केली होती. दिवेआगर सुवर्णमूर्ती प्रकरणी सभागृहात आरती करून निलंबन ओढवून घेतले होते. मात्र या आंदोलनाबाबत गटनेते सुभाष देसाई यांना कसलीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे देसाई नाराज आहेत. या अधिवेशनातही शिवसेनेत दुफळीच माजण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितले की सरकारला धारेवर धरण्यासाठी योग्य संधी असतानाही गेल्या वेळी काहीच करण्यात आले नाही. या वेळी मात्र तसे होऊ देणार नाही.
जळगावात गँगवॉर :शिवसेना पदाधिका-याच्या घरावर हल्ला, गोळीबार
शिवसेना-भाजपमध्‍ये आता शिक्षक मतदारसंघावरुन जुंपली
राष्ट्रपतिपद निवडणूक - उमेदवारीवरून शिवसेना - भाजपत मतभेद