आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेबांना अटक करणा-या भुजबळांवर काळानेच सूड उगवला- उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गृहमंत्री म्हणून भुजबळांनी अनेकांना तुरुंगात पाठवले. ज्यांनी त्यांचे ऐकले नाही अशा अनेकांना खोटी प्रकरणे तयार करून, पोलिसी यंत्रणेचा गैरवापर करून तुरुंगात पाठवले. भुजबळ गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचा विडाच उचलला होता. आता भुजबळही त्याच मार्गाने तुरुंगात गेले पण हा काळाने घेतलेला सूड आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भुजबळांवर प्रहार केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनात 'भुजबळ आत गेले' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून छगन भुजबळांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, छगन भुजबळ यांना अखेर अटक झाली आहे. भुजबळ हे शिवसेनेत होते तेव्हा त्यांना अनेकदा अटक झाली. या अटका महाराष्ट्र, मराठी प्रश्‍नांसंदर्भात केलेल्या आंदोलनासंदर्भात होत्या. मुंबईचे महापौर असताना भुजबळ वेशांतर करून बेळगावात पोहोचले. त्यांनी सीमा भागातील मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाविरोधात आंदोलन करताच निर्दयी कानडी पोलिसांनी त्यांना अटक केली. या अटकेमुळे भुजबळ हीरो झाले, पण भुजबळांना आता झालेली अटक ही भ्रष्टाचार, लपवाछपवी अशा गुन्ह्यांसाठी आहे. भुजबळांना अटक झाली म्हणून कुणाला वाईट वगैरे वाटल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री व गृहमंत्री असताना भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले घोटाळे हे त्यांच्या अटकेचे कारण आहे. शिवसेनेत असताना ते महाराष्ट्राच्या प्रश्‍नांसाठी तुरुंगात गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीत असताना भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जात आहेत. हा फरक समजून घेतला पाहिजे. राजकीय स्वार्थासाठी झालेले हे अध:पतन आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी भुजबळ आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
पुढे वाचा, उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांसह राष्ट्रवादीवर कशा शब्दांत केली आहे टीका...
बातम्या आणखी आहेत...