मुंबई- महाराष्ट्र पोलिस दल सध्या हत्या आणि आत्महत्या प्रकरणाने चर्चेत आले आहे. हाच धागा पकडून शिवसेनेने गृहमंत्रीपद संभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी
आपण पार्टटाइम गृहमंत्री नसून ओव्हरटाइम गृहमंत्री असल्याचे जाहीर केले, पण पोलीस मात्र सततच्या ओव्हरटाइमने बेजार झाले असून ते आपल्याच सहकार्यांच्या हत्या व आत्महत्या करू लागले आहेत, अशा शब्दांत निशाणा साधला आहे.
सुट्टीच्या वादावरून मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विलास जोशी व सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांच्यात वाद झाला. त्या वादातून शिर्के यांनी विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडल्या व स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. हे सर्व फक्त एक दिवसाच्या रजा प्रकरणावरून झाले. फौजदार शिर्के यांनी शुक्रवारी न सांगता रजा घेतली. या प्रकाराची नोंद रात्रपाळीच्या पोलीस निरीक्षकाने स्टेशन डायरीत केली. शिर्के त्यामुळे संतापले व त्यांनी अनर्थ केला. अखेर या घटनेत दोन्हीही अधिकार्यांना प्राण गमवावा लागला. वाकोला पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पोलिसांनीच पोलिसांचे रक्त सांडले. या घटनेनंतर महाराष्ट्र पोलिस दल खासकरून मुंबई पोलिस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याची दखल शिवसेनेने घेत सामनातून पोलिसांच्या स्थितीवर भाष्य करीत पार्टटाईम व ओव्हरटाईम या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून हल्लाबोल केला आहे.
\'सामना\'च्या अग्रलेखात म्हटले आहे की, सुट्टीच्या क्षुल्लक वादावरून मुंबई पोलिसांतील दोन अधिकार्यांना प्राण गमवावा लागला. वाकोला पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पोलिसांनीच पोलिसांचे रक्त सांडले. यासारखे दुर्दैव काय म्हणता येईल! पोलिसांची मन:स्थिती नेमकी कशी आहे? याचे दर्शन वाकोल्यातील घटनेने झाले. पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो आहे. पोलिसांना माणुसकीने वागवले जात नाही. पोलीस माणूस आहे व त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनादेखील त्यांच्या कुटुंबाकडे पाहावे लागते याचा विचार कोणी करणार नसेल तर वाकोल्याप्रमाणे घटना घडत राहतील, अशी भीती अग्रलेखातून व्यक्त केली आहे.
पुढे वाचा, शेतक-यांप्रमाणेच पोलिसही आत्महत्या करू लागले आहेत...
फडणवीस, तुम्ही मुफ्तीपेक्षा वेगळे आहात ते सिद्ध करा- शिवसेना.....