आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Starts Preparation Of Loksabha, Constituncies Report Submited To Udhav

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली, मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांना सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेकडे असलेल्या 22 मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा आढावा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. विशेषत: मनसेमुळे शिवसेनेच्या कोणत्या जागांना धक्का लागू शकतो आणि मुंबईतील जागाच्या स्थितीबाबत चर्चा झाली. मातोश्री येथे झालेल्या बैठकीला खासदार संजय राऊत, वरिष्ठ नेते मनोहर जोशी, विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई, रामदास कदम आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही उपस्थित होते.


प्रत्येक मतदार संघातील पदाधिकारी, नेते यांच्याशी बोलून शिवसेनेचे वरिष्ठ नेते लीलाधर डाके आणि सुभाष देसाई यांनी तयार केलेला हा अहवाल या वेळी उद्धव यांना देण्यात आला व त्यावर चर्चाही झाली. गेले दोन महिने शिवसेनेचे नेते लोकसभा निवडणुकांचा अहवाल बनवण्याच्या कामामध्ये असून त्यानुसार पुढील प्रचार दौरे, कार्यक्रम आदींची आखणी केली जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. उद्धव यांनी स्वत: लोकसभेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले असून आता प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे. 22 मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड मजबूत करण्याचे प्रयत्न केले जाणार असून स्वत: उद्धव त्या ठिकाणी दौरे करतील, असे समजते. गेल्यावेळी हरलेल्या जागांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून मनसेने महायुतीमध्ये यावे म्हणून भाजपकडून सातत्याने आवाहन केले जात होते. मात्र, भाजप नेत्यांकडून वेळोवेळी करण्यात आलेली थेट वक्तव्ये उद्धव ठाकरे यांना मूळीच आवडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. उलट मनसेमुळे शिवसेनेच्या कोणत्या जागा धोक्यात येऊ शकतात याचाच या बैठकीत विचार
करण्यात आल्याचे कळते.


मोदींबाबत चाचपणी
भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणूक प्रचाराची धुरा दिल्यामुळे त्याचा फायदा युतीमध्ये लढताना शिवसेनेला मिळू शकतो का, यावरही चर्चा करण्यात आली. उद्धव यांनी स्वत: काही मतदारसंघातील नेत्यांशी बोलून तेथील परिस्थिती समजून घेतली होती. या वेळी ही माहिती त्यांनी उपस्थित नेत्यांना दिली. शिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीने आखणी झाल्यानंतर युतीतील पक्षांशी चर्चा होणार आहे.