Home »Maharashtra »Mumbai» Shivsena Support Bjp In Bmc Bypoll

पालिका पोटनिवडणुकीत सेना-भाजपचे मनोमिलन; तावडेंच्या भेटीनंतर उद्धव यांनी दिला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी | Nov 15, 2017, 07:42 AM IST

मुंबई-मुंबई मनपा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये अाता मनाेमिलनाचे वारे वाहू लागले अाहेत. चारकाेप वाॅर्डामधील पाेटनिवडणुकीत शिवसेनेेने चक्क भाजपला पाठिंबा जाहीर केले अाहे.

मुंबई मनपा निवडणुकीत दाेन जागा जास्त मिळवून शिवसेनेने महापाैरपद पटकावले हाेते. त्यानंतर भाजपने पाेटनिवडणुकीत अाणखी एक जागा पटकावत महापाैरपदाच्या दिशेने हालचाली सुरू केल्या हाेत्या. तर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ‘मनात आणले तर २४ तासांत भाजपचा महापाैर बसवू’ असा गर्भित इशाराही दिला हाेता. त्यानंतर सावध झालेल्या शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक गळाला लावून आपले संख्याबळ वाढवले. दरम्यान, चारकोप वॉर्ड २१ मधील भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे १३ डिसेंबरला पाेटनिवडणूक हाेत अाहे. शैलजा या भाई गिरकर यांच्या पत्नी हाेत्या. आता निवडणूक रिंगणात असलेल्या गिरकर यांच्या स्नुषा प्रतिभा यांना पाठिंबा द्यावा म्हणून भाजपतर्फे प्रयत्न सुरू होते. गिरकर कुटुंबीयांशी असलेले संबंध लक्षात घेऊन ठाकरे यांनी प्रतिभा यांना पाठिंबा दिला.
भाईंसाठी सारे काही...
भाजप अामदार भाई गिरकर व शिवसेनेचे चांगले संबंध आहेत. मंगळवारी मातोश्रीवर प्रतिभा यांना पाठिंबा देण्याविषयी भाई व विनोद तावडे यांच्यात चर्चा झाली आणि उद्धव यांनी प्रतिभा यांना पाठिंबा जाहीर केला.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended