आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Target Bjp Over Pulses Rate, Saamana Editorial

तूरडाळीचे काय झाले? वहिनीसाहेबांचे तरी ऐका! उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात सत्ताबदल घडविणा-या जनतेला निदान ‘डाळ-भात’, ‘डाळ-रोटी’ तरी मिळायलाच हवी. हे राज्य साठेबाज व काळाबाजारवाल्यांचे नाही हे आता कृतीने दिसू द्या. तूरडाळीच्या प्रश्‍नास मुख्यमंत्र्यांच्या स्वयंपाकघरातूनच तोंड फुटले आहे. सौ. अमृता वहिनी या एक सामान्य गृहिणी व खासकरून नोकरदार महिला असल्याने त्यांना सामान्य गृहिणींची ओढाताण समजली आहे, असे सांगत तूरडाळीचे काय झाले? वहिनीसाहेबांचे तरी ऐका असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी हाणला आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात तूरडाळीचे भाव अजून कमी का होत नाहीत असा सवाल करून शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा घेरले आहे. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महागाई कमी झाली पाहिजे व तूरडाळीचे भाव आवाक्यात राहिले पाहिजेत असे मत व्यक्त केले होते. नेमका हाच मुद्दा घेऊन शिवसेनेने फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, एकेकाळी गाजलेल्या ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या ‘डायलॉग’प्रमाणेच ‘तूरडाळीच्या भावाचे काय झाले?’ असा सामान्य प्रश्‍न सामान्य जनता विचारीत आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता वहिनींची भर पडली आहे व सामान्य गृहिणींच्या भावनांचा स्फोट केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गातर्फे आम्ही त्यांना लाख लाख धन्यवाद देत आहोत. ‘‘सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार्‍या तूरडाळीचे भाव आवाक्यात आलेच पाहिजेत,’’ असे सौ. अमृता वहिनीसाहेबांनी बजावले आहे. अमृता वहिनींनी सरकारला असा सल्ला दिला आहे की, ‘‘तूरडाळीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्यात ठेवायचे असतील तर सर्वसामान्य ग्राहक व शेतकरी यांच्यातील ‘दलालां’ना म्हणजेच मध्यस्थ व्यवस्थेस दूर ठेवले पाहिजे!’’ सौ. अमृता वहिनी या एक सामान्य गृहिणी व खासकरून नोकरदार महिला असल्याने त्यांना सामान्य गृहिणींची ओढाताण समजली आहे. ऐन दिवाळीत तूरडाळ 200 रुपये किलोवर गेलीच कशी? हा प्रश्‍न आहे. तूरडाळीच्या ठिणग्या उडाल्यावर साठेबाजांवर छापेमारी सुरू झाली. प्रत्यक्ष त्या खात्याचे मंत्री गिरीश बापटही गोदामांवर धाडी घालून सरकारच्या कार्यक्षमतेची तुतारी वाजवीत होते, पण आजही तूरडाळीचे भाव खाली उतरले नाहीत, अशी टीका केली आहे.
पुढे आणखी वाचा, कशा शब्दांत केली आहे भाजपसह गिरीश बापटांवर टीका...