आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचा आदर असता तर 25 वर्षांची युती तोडलीच नसती- शिवसेनेची मोदींवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आणि श्रद्धा आहे. त्यांना आदरांजली म्हणूनच शिवसेनेवर आपण टीका करणार नाही असे नरेंद्र मोदी म्हणत आहेत तर मग हिंदुत्वाच्या घट्ट धाग्याने बांधलेली आणि शिवसेनाप्रमुखांनी 25 वर्षे अभेद्य ठेवलेली शिवसेना-भाजप युती यावेळीच कशी तुटली? केवळ जागावाटपाच्या मुद्यावरून युती तुटत असताना शिवसेनाप्रमुखांबद्दलचा आदरभाव कुठे गेला होता? जागावाटपाचा वाद ताणून न धरता शिवसेना-भाजप युती अभेद्य ठेवली असती तर तीच शिवसेनाप्रमुखांना खरी श्रद्धांजली ठरली असती, अशा शब्दात शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगाव येथील जाहीर सभेत बाळासाहेबांबद्दल आदर असल्याने शिवसेनेवर टीका करणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याला शिवसेनेने जोरदार आक्षेप घेत आज 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर दिले आहे.
नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करताना अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न घेऊनच भाजपवाले निवडणुकांत उतरले आहेत. पण ‘भाजप’च्या सार्वजनिक उत्सव मंडळाने लक्षात घेतले पाहिजे की, तुमच्याकडे शेठ-सावकारांचे बळ असेल, कारस्थाने व कटांचे बुद्धिबळ असेल, पाठीत खुपसण्यासाठी खंजीर असतील, पण शिवाजीराजांचा आशीर्वाद इतका स्वस्त नाही. शिवाजी महाराज म्हणजे चालता-बोलता पुरुषार्थ! हा पुरुषार्थ कुठून आणाल? हे राज्य शिवरायांचे आहे हे दिल्लीच्या नव्या अधिपतींनी विसरू नये. मोदी म्हणे महाराष्ट्रात प्रचारात आले आहेत. पण देशाच्या पंतप्रधानांनी आपला किमती वेळ राज्याच्या निवडणुकीसाठी खर्च करावा व त्यासाठी रणरणत्या उन्हात फिरावे हे बरोबर नाही. येथील जनता काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनागोंदी व भ्रष्ट कारभारास कंटाळली आहे. राज्याची जनता शहाणी आहे व त्यांना खरे लुटारू व छुपे लुटारू कोण, ‘मूंह में राम’ आणि ‘बगल में छुरी’वाले कोण याची माहिती आहे, असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने भाजप व नरेंद्र मोदींवर कोणत्या शब्दात केला आहे हल्ला...