आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Targets Cm Devendra Fadnavis Over Drought Issue In Maharashtra.

पाणीबाणी: CM साहेब \'भारत माता की जय\' म्हणायला माणसे जिवंत राहावीत- उद्धव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले आहे व फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही. पाण्याच्या टाक्या व टँकरवर पोलिसांचे पहारे बसविण्यात आले असून पाण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला हे चित्र धक्कादायक आहे. ‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या! अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त 'महाराष्ट्रात महायुद्ध तहानलेल्यांना आधी पाणी द्या' नावाचा अग्रलेख लिहून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारतमाता की जय’ बोलणारच असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठणकावले आहे हे छानच झाले, पण भारतमातेची लेकरे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, तडफडत आहेत, पाण्यासाठी एकमेकांचे रक्त पिण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरे झाले असते, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाण्यासाठी 144 कलम लागू करण्यात आले आहे. मराठवाड्याचे साफ वाळवंट झाले आहे व लातूर-धाराशीवसारख्या जिल्ह्यांत 40 दिवसांनी पाणी मिळते. पाण्याच्या टाक्या व टँकरवर पोलिसांचे पहारे बसविण्यात आले असून पाण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला हे चित्र धक्कादायक आहे. अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलून नक्षलवादाचा मार्ग अनेक तरुणांनी स्वीकारला. मराठवाड्यातील तरुण घोटभर पाण्यासाठी शस्त्र हातात घेऊन दहशतवादी तर बनणार नाहीत ना? अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर कोणत्या शब्दांत ताशेरे ओढले आहेत...