मुंबई - शिवसेनेच्या निशाण्यावर आता पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान आहे. शिवसेनेने या कलाकारांना त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करु देणार नसल्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली, त्यानंतर भारत-पाक सामन्यांना विरोध, यानंतर सेनेने त्यांचा मोर्चा सॉफ्ट टार्गेट असलेल्या कलाकारांकडे वळवला आहे. त्यासोबतच पाकिस्तांनी लोकांसोबतचा कोणताही कार्यक्रम मुंबई आणि महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. पुण्यातील पाकिस्तानी शेफचा फुड फेस्टीव्हल उधळण्याचाही इशारा सेनेने दिला आहे.
कोण आहे फवाद आणि माहिरा
अभिनेता फवादने 2014 मध्ये 'खूबसूरत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या तो धर्मा प्रोडक्शनच्या 'कपूर अँड सन्स' आणि 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात काम करत आहे. ए दिलचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. यात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि एश्वर्या राय -बच्चन यांच्या देखिल भूमिका आहेत. हा चित्रपट दिवळीत प्रदर्शित होणार आहे.
माहिराने राहुल ढोलकियाच्या रईस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरुख खान आहे. चित्रपट 2016 मध्ये ईद दरम्यान प्रदर्शित होईल. यात नवाजुद्दीन सिद्दीकी देखिल आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा, -आधी मोदींना विचारा
‘पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा निवडणुकीपूर्वी सभांमधून जाहीर केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम पंतप्रधानांशी चर्चा करावी आणि नंतर पाकिस्तानी लाेकांना राज्यात सुरक्षा देण्याबाबत वक्तव्ये द्यावीत, असा सल्लाही कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
पुढील स्लाइडमध्ये, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंना मंत्री रामदास कदमांचा टोला