आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांनो निवडणुकीच्या तयारीला लागा; आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेच्या आमदारांची बैठक गुरुवारी येथे पार पडली. याच बैठकीत ठाकरेंनी राज्यात मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले. (फाईल) - Divya Marathi
शिवसेनेच्या आमदारांची बैठक गुरुवारी येथे पार पडली. याच बैठकीत ठाकरेंनी राज्यात मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले. (फाईल)
मुंबई - शिवसेनेच्या आमदारांनी महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आदेश पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सुत्रांकडून समजते. शिवसेनेच्या आमदारांची बैठक गुरुवारी येथे पार पडली. याच बैठकीत ठाकरेंनी राज्यात मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले. 
 
केंद्र आणि राज्यात विविध मुद्यांवर सत्ताधारी भाजप आणि घटकपक्ष शिवसेनेत मतभेद सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक, सीमेवर जवानांच्या मृत्यूचे प्रकरण, दहशतवादी हल्ला अशा विविध बाबींचा समावेश आहे. यापूर्वी बुधवारीच उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात योगी सरकार आणि महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार असल्याची बोचरी टीका केली होती. तसेच मोदींनी गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवा असेही उद्धव म्हणाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या भाषणांमधून आणि पत्रकार परिषदांमधून शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे, तर शिवसेनेने वेळोवेळी राज्य आणि केंद्रात भाजपची साथ सोडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...