आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तार : केवळ एका मंत्रीपदाची ऑफर असल्याने शिवसेना नाराज; 3 मंत्रीपदासाठी आग्रही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात केवळ एका मंत्रीपदाची ऑफर असल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. - Divya Marathi
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात केवळ एका मंत्रीपदाची ऑफर असल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे.
मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात केवळ एका मंत्रीपदाची ऑफर असल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. संयुक्त जनता दलाचे 12 खासदार असताना त्यांना 2 मंत्रीपदे मिळत आहेत. त्या तुलनेत 21 खासदार असलेल्या शिवसेनाला 3 मंत्रीपदे मिळायला हवी, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. 
 
शिवसेनेच्या कोणाची नावे आहेत चर्चेत
राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. अनेकदा शिवसेना आणि भाजपचे नेते परस्परांवर टीका करताना दिसतात. मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर तर भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता केवळ एक मंत्रीपदाची ऑफर असल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी खासदार अनिल देसाई आणि खासदार आनंदराव अडसूळ यांची नावे चर्चेत आहेत. खासदार आनंदराव अडसूळ यांना मंत्रीपद देऊन शिवसेना विदर्भात आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करु शकते. अनंत गीते हे सध्या अवजड उद्योग मंत्रालय सांभाळत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना आणखी एकच मंत्रीपद मिळणार असल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...