आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाचा पंजा अन् दात, सोशल मिडियात फडणवीसांचे फोटो व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुडे आला. शिवसेनेने 52 जागा जिंकल्या मात्र एकवेळ शिवसेना 68 जागांवर आघाडीवर होता. तर भाजप 30 पर्यंत अडखळला होता. नंतर मात्र भाजपने मुसंडी मारत आपली संख्या 42 पर्यंत नेली. मात्र, तोपर्यंत शिवसैनिकांच्या आनंदला उधाण आले होते. या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली होती.
आमची तुम्ही 25 वर्षे दोस्ती पाहिली पण वाघाचा पंजा पाहिला नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर वाघाच्या जबड्यात हात घालुनी दात मोजणारी आमची जात असे सांगत फडणवीसांनी उद्धव यांना उत्तर दिले होते. मात्र, आज निकाल लागताच मुख्यमंत्री फडणवीस शिवसैनिकांच्या निशाण्यावर आले. शिवसैनिकांनी फडणवीसांचा वाघाने हात तोडल्याचा, हात मोडल्याचे फोटो सोशल मिडियात टाकले. काही वेळात ते व्हायरल झाले.
पुढे पाहा, सोशल मिडियात व्हायरल झालेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...