आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांना मोफत टॅब, शाळांना टीव्ही; शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये ‘ई- लर्निंगवर भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शिक्षण क्षेत्रात ई-क्रांती आणण्याचा निर्धार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास सरकारी शाळांत टीव्ही विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची घोषणाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. निवडणुका जवळ येताच सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने जनहितांच्या विविध योजनांची खैरात वाटण्याचा धडाका लावलेला असताना आता विरोधी पक्षही त्यात मागे राहिलेले नाहीत. शिवसेनेने यापूर्वीच आपल्या व्हिजन डॉक्युमेंटचा काही भाग जनतेसमोर मांडला होता. गुरुवारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या ‘व्हिजन’चा दुसरा भाग सादर करताना ई- लर्निंगचे सादरीकरण केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी भावनाही उद्धव यांनी बोलून दाखवली.
काय आहे ई-लर्निंग योजना
- पालिका जिल्हा परिषद शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेला टॅब एसडी कार्ड देण्यात येईल.
- सरकारी शाळांना प्रत्येकी एक टीव्हीही देण्यात येणार आहे.
- ग्रामीण भागात विजेचा मोठा प्रश्न असल्याने टॅब चार्ज करण्यासाठी साेलार चार्जरही देण्यात येईल.
- एसडी कार्ड स्मार्टफोनमध्ये वापरून विद्यार्थी अभ्यास करतील
- पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा समावेश असलेली किट, पेन ड्राईव्ह
- शालेय विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून वसंत पोतदार यांच्या ‘वंदेमातरम’ आणि शिवाजीराव भोसले यांच्या ‘दीपस्तंभ’ पुस्तकांचाही या किटमध्ये समावेश.
- सुरुवातीला मराठीत असलेला हा ई- अभ्यासक्रम हिंदी, उर्दू आणि गुजराती येणार
उधळपट्टी नाही - आगामीचार दिवसांत व्हिजन डॉक्युमेंटमधील आणखी एका योजनेचे सादरीकरणही करणार आहेत. जाहिरातीतच नव्हे तर खरोखरच महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेण्याचा आमचा प्रयत्न असून सरकारच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करणार नाही, असे उद्धव म्हणाले.
अमित शहांवर मौन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुरुवारी मुंबईत होते. ते उद्धव ठाकरेंना भेटणार की नाही, याबाबत बुधवारपर्यंत अनेक तर्क- वितर्क लढविले जात होते. मात्र, गुरुवारी पत्रकार परिषदेपूर्वीच रात्री साडेनऊच्या सुमारास शहा मातोश्रीवर स्नेहभोजनास जाणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत अमित शहा यांच्याबद्दलच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले.