आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुती सत्तेत आल्यास 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब- उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- उद्धव ठाकरे)
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महायुतीचे सरकार आल्यास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात आमुलाग्र बदल करणार असल्याची घोषणा केली. शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी ई-प्रबोधन योजना राबविणार असून, त्याअंतर्गत 8 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब, पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे एसडी मेमरी कार्ड, सोलार चार्जर व ई-क्लासद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी एक विशेष किट देण्यात येईल. यात पेन ड्राईव्ह, एक टीव्ही, पुस्तकांची समावेश असेल. याचबरोबर गरीब व दुर्लब घटकांतील मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केले.
शिवसेनेने मागील आठवड्यात "व्हिजन डॉक्युमेंट' जाहीर केले होते. यात कोणत्या मुद्यांवर व क्षेत्रात काय करणार याची माहिती दिली होती. मात्र, प्रत्येक विभागात व क्षेज्ञात कोणत्या योजना असतील याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी आज मुंबईत 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन फक्त शिक्षण क्षेत्राबाबतची संकल्पना मांडली. व्हिजन डॉक्युमेंटमधील हा पुढचा टप्पा आहे. यानुसार प्रत्येक क्षेत्रानुसार येत्या आगामी काळात एक-एक अशी माहिती देणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
उद्धव म्हणाले, शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे. मुलांना पहिल्यापासून दफ्तराचे ओझे मोठे आहे. ते कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सेनेच्या नेतृत्तावखालील महायुतीचे सरकार आल्यास बदल करेल. ग्रामीण भागात अनेक शाळांत शिक्षकांचा तुटवडा असतो. मुलांना शिक्षकांबरोबर ई-लर्निंगचे धडे गिरवता आले पाहिजेत. मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी पहिली ते दहावीच्या सर्व मुला-मुलींना संपूर्ण अभ्यासक्रम असलेले एसडी मेमरी कार्ड दिले जाईल. याचबरोबर इयत्ता 8 ते 10 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब देणार आहोत. मात्र, हे टॅब फक्त शहरी व सरकारी शाळांतील 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विजेअभावी अभ्यास करता येत नाही त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता सोलार चार्जर उपलब्ध करून देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांना देशभक्तांची व थोर नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हावी व प्रेरणा मिळावी यासाठी ‘वंदे मातरम्’ पुस्तक भेट देणार आहे.
ई-क्लासद्वारे मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी एक विशेष किटही देण्यात येणार आहे. या किटमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम असलेला पेन ड्राईव्ह, एक टेलिव्हिजन सेट व त्यासाठी लागणारे वस्तू देण्यात येणार आहेत. गरीब व दुर्लब घटकांतील मुलांनी शाळेची वाट सोडू नये यासाठी विशेय योजना राबवून ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण आजही प्राथमिक शाळेतून मुलांची मोठी गळती होत असल्याचे त्यांनी सांगितले. या फक्त घोषणा नसून, सत्तेत येताच सेनेने जे जे काही व्हिजन डॉक्युमेंटमध्ये सांगितलेले असेल त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही उद्धव यांनी सांगितले.