आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Want MIM Support For Mayor In Aurangabad

प्रसंगी एमअायएमशी घराेबा करू, औरंगाबादेत महापौरपदासाठी शिवसेनेचा पवित्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आले असतानाही भाजपने महापौरपदासाठी अर्ज दाखल करून सत्तेसाठी किती हपापले आहोत हे दाखवत नैतिकता गमावली, असा आरोप शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याने केला. एवढेच नाही तर भाजपने साथ न दिल्यास अपक्ष, बंडखोर, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या मदतीने हे पद मिळवण्याची आमची तयारी असल्याचेही या मंत्र्याने म्हटले आहे.
 

महापालिकेत शिवसेनेला २९, तर भाजपला २२ जागा मिळाल्या.  गेल्या वेळी शिवसेनेसाठी स्थायी समिती सभापतिपद सोडलेले असतानाही भाजपने दगा देऊन राजू शिंदे यांना निवडून आणले होते. त्याच शिंदेंना भाजपने महापौरपदाची उमेदवारी दिली. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे उमेदवार आहेत. महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावे, असा सूर भाजपने काढला होता. मात्र, शिवसेना एक वर्ष देण्यास तयार होती, असे समजते. संख्याबळ जास्त असते तर भाजपने आम्हाला महापौरपद दिले असते का, असा सवाल या मंत्र्याने केला.
 

मंगळवारी पुन्हा चर्चेसाठी बैठक असून तोडगा न निघाल्यास भाजप स्वबळ अजमावण्याच्या तयारीत असल्याचे पक्षाच्या नेत्याने म्हटले.
 

एमआयएमची साथ; भाजपचीही फील्डिंग
भाजपची बंडखोर, अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी व एमआयएमच्या मदतीने ४०चे संख्याबळ गाठण्याची योजना आहे. स्वबळावर महापौरपद मिळवण्याची तयारी असून, माजी आमदार किशनचंद तनवाणींवर ही जबाबदारी असल्याचे समजते.