आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Warning Modi rajnath Singh On Advani\'s Issue

अडवाणी युगाचा अस्त झालेला नाही- शिवसेनेचा मोदी व भाजपला सूचक इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठांचे जनतेचे नाते तुटलेले नाही. सध्या राजकारणात घडत असलेल्या भल्याबुर्‍या प्रसंगांच्या तुलनेत आडवाणींची गोष्ट छोटी वाटत असली तरी दुर्घटना मोठी घडू शकते. वेळ निघून गेल्यावर ताळ्यावर येण्यात अर्थ नसतो हे कुणीच विसरू नये, असे सांगत शिवसेनेने मोदी कंपनी आणि भाजपला सूचक इशारा दिला आहे. अरूण जेटली, राजनाथ सिंह हे जर मनपसंत मतदारसंघातून लढू शकतात तर आडवाणी का नाहीत, असे सांगत सेनेने आपण आजही आडवाणी-सुषमा यांच्या पाठीशी खंभीरपणे मागे आहोत, असे दाखवून दिले.
शनिवारच्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपमधील अंतर्गत घडामोडींवर शिवसेनेने भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, लालकृष्ण आडवाणी यांच्या लोकसभा मतदारसंघावरून थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबप्रमुख पित्याकडून घराची चावी हिसकावून घेताना त्याला थप्पड लगावून वृद्धाश्रमात पाठविण्याचा प्रयत्न करणे हे कसले संस्कार आहेत? असा सवाल आडवाणींच्या बाबतीत कॉंग्रेसने विचारला आहे. खरं तर कॉंग्रेसने ज्येष्ठांच्या मानसन्मानाच्या गप्पा मारू नयेत. सीताराम केसरी व नरसिंह राव यांच्या बाबतीतही त्यांच्या उतरत्या वयात असेच अपमानाचे वर्तन कॉंग्रेसने केले होते. ते काहीही असले तरी आडवाणी ते आडवाणीच! भारतीय जनता पक्षाच्या चाव्या आपल्याच खिशात आहेत हेच आडवाणी यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीत यायला हरकत नव्हती, पण तसे झाले नाही. ज्यांनी पक्ष उभा केला व आजचे वैभवाचे दिवस दाखवले त्या आडवाणींना अखेरपर्यंत लोंबकळत ठेवले गेले आणि शेवटी आडवाणी यांनी ‘गांधीनगर’मधून लढायचे नाही तर ‘भोपाळ’मधूनच लढायचे आहे असा पापड तोडताच सगळ्यांची धावाधाव झाली. भाजपमध्ये मोदीयुग सुरू झाले आहे, पण देशाच्या राजकारणात आडवाणीयुगाचा अस्त झालेला नाही, असे सांगत मोदी-राजनाथ यांना सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
आणखी पुढे वाचा, शिवसेनेने काय दिला इशारा...